Share

राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला कदापिही माफ करणार नाही- स्नेहलता कोल्हे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर घाला घातला आहे. परीक्षा व भरतीच्या तोंडावर अचानक आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुण संतप्त झाला आहे. राज्याच्या राजकारणात अनेक मराठा नेते आहेत. विधानसभेत बहुसंख्य मराठा समाजाचे आमदार असून त्यातले अनेकजण मंत्रीपदेही भूषवित आहेत.

परंतु मराठा आरक्षणाबाबत असलेल्या उदासीनतेमुळे ही नेते मंडळी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करू शकत नाही. त्यामुळे राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला कदापिही माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, सकल मराठा समाजाच्या राज्यात निघालेल्या मोर्चाच्या संघटित शक्तीने आरक्षणाच्या मागणीला खरी ताकद मिळाली. यासाठी अनेकांनी बलिदान दिले. या सर्व सामाजिक एकजुटीचा विजय आरक्षणाच्या निर्णयात झाला. मिळालेले आरक्षण कायमस्वरूपी टिकावे म्हणून ज्या गांभीर्याने महाविकास आघाडी सरकारने निर्णय करायला हवे होते परंतु ते न झाल्यानेच न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडण्यात सरकार कमी पडले, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे, असे कोल्हे म्हणाल्या.

जनमत नसतानाही हे सरकार सत्तेवर आलेली आहे. हे सरकार एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करून आर्थिक सोयींचे निर्णय घेण्यात मग्न आहे. राज्यात पोलीस भरती करून मराठा समाजाच्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोपही कोल्हे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!