Share

‘या’ शहराच्या मनपातील आरोग्य समितीच्या सभापतींना दुसऱ्यांदा कोरोना  

Published On: 

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तसेच मनपातील आरोग्य विशेष समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी रविवारी (ता. २0 सप्टेंबर) कोरोना चाचणी केली. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला आहे. याव्यतिरिक्त त्यांची पत्नी व दोन मुलांचाही कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

यापूर्वीही त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणाच आता कोरोनाबाधित होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. शहरात दिवसागणिक दोन हजारांवर रुग्ण बाधित होत आहेत. मृत्यूची संख्या वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील ३0 दिवसांत शहरातील कोरोना बाधितांची स्थिती ही दुप्पट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या तसेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या उपाययोजनासंदर्भात महापालिकेची आरोग्य समिती महत्त्वपूर्ण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सभापती हे कोविड बाधित झाले आहेत. वीरेंद्र कुकरेजा यांनी मागील सात दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी या संसर्गातून लवकरच बाहेर येण्याचे व जनतसेवेत सक्रिय होण्याचे आश्‍वासन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!