Share

करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’

Published On: 

बीड : परळीत आल्यानंतर वैद्यनाथ मंदिर परिसरात जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बीड येथील कारागृहातून त्यांची तीन दिवसांपूर्वी मुक्तता करण्यात आली.

करुणा शर्मा यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही कुणाचेच नाव न घेता ‘परळीची मान राज्यभरात झुकली’ अशी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी करुणा शर्मा प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

‘एट्रॉसिटी कायदा हा दलितांचे कवच कुंडल आहे, दलित वर्गाच्या सुरक्षेसाठीच त्याचा वापर झाला पाहिजे. पण त्याचा दुरुपयोग होत आहे. हे अतिशय गंभीर आहे. प्रशासन दावणीला बांधलेले असल्यास खोटे गुन्हे दाखल होतात. तेच सुरू आहे बीडमध्ये. शासन आणि प्रशासन दोघे मिळून अन्याय करत आहेत तर न्याय कोणाकडे मागावा, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

‘बीडसह राज्यभरात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याचा तीव्र संताप आणि निराशा मी व्यक्त करते. जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी एक माफिया तयार झाले आहे. तसा पोलिसांचा धाक राहिला नाही. महिलांवर अत्याचार झाला तर त्याच्यावर विशेष बैठक घेऊन न्याय दिला पाहिजे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत फक्त बजेट वाटपाचा विषय न होता याही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे, जिल्ह्यामध्ये फिरताना महिलांना सुरक्षित वातावरण वाटावे असे काम करा’ असा सल्लावजा टोलाही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!