Share

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा अहंकार, गर्दीच्या कार्यक्रमांवरून एसपींना भेटणार-पंकजा मुंडे

Published On: 

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे जन्मसोहळे धुमधडाक्यात साजरे होत आहे. आजही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून मेळावे घेतले जात आहेत. यावर आपण बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परळीमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा अहंकार आहे. आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्या कार्यालयावरही गुन्हे दाखल झाले. त्याच दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम, दिवाळी फराळाचे कार्यक्रम झाले. आता मेळावे घेतले जात आहेत, त्याबाबत तुम्ही काय करणार? असा सवाल आपण पोलीस अधिक्षकांना विचारणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भेट दिली. तसेच सध्या त्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सोमवारी परळी येथे पंकजा मुंडेनी नागरिकांना एक सुखद धक्का दिला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे शहरातील अंबेवेस भागातील एका हॉटेलमध्ये चहाचा आस्वाद घेत असत. त्याच ठिकाणी पंकजा यांनी अचानकपणे भेट देऊन चाय पे चर्चा केली.

पंकजा मुंडे आज सकाळपासूनच परळी शहरात विविध भागात भेटी देत होत्या. अंबेवेस भागात आल्यानंतर त्या अचानक थेट प्रकाश खोत यांच्या म्हाळसाकांत हॉटेलमध्ये गेल्या. खोत यांचे वडिल गोपीनाथ मुंडे यांचे सुरुवातीपासूनचे सहकारी होते. गोपीनाथ मुंडे नेहमी या ठिकाणी आवर्जून चहा पिण्यासाठी येत असत. या माध्यमातून ते थेट नागरिकांशी संवादही साधायचे. आज त्याच हॉटेलमध्ये पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यांनी खोत कुटुंबीयांची त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांनी तयार केलेला चहा देखील घेतला. यावेळी या भागातील नागरिक देखील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत चहाचा आस्वाद घेताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!