Share

‘लोक अडचणीत आहेत आणि यांचं काय सुरुये?’, पंकजा यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

Published On: 

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परळीमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावरून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा अहंकार आहे. आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्या कार्यालयावरही गुन्हे दाखल झाले. त्याच दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम, दिवाळी फराळाचे कार्यक्रम झाले. आता मेळावे घेतले जात आहेत, त्याबाबत तुम्ही काय करणार? असा सवाल आपण पोलीस अधीक्षकांना विचारणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले.

‘त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. मोठे केक कापण्यात आले. कोरोना अद्यापही गेलेला नाही. लोक आर्थिक अडचणीत आहेत आणि यांचं काय सुरु आहे, अशा शब्दात पंकजा यांनी नाव न घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. सत्ता असो की नसो दुरुपयोग करणे हेच त्यांना समजते, असा टोलाही पंकजा यांनी लगावला आहे.

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचे जन्मसोहळे धुमधडाक्यात साजरे होत आहे. आजही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून मेळावे घेतले जात आहेत. यावर आपण बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!