Share

पंकजा मुंडेंना धक्का! ‘वैद्यनाथ’ साखर कारखान्याचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश

Published On: 

मुंबई : राज्यातील तब्बल ४४ सहकारी साखर कारखान्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गेवराईतील जयभवानी कारखान्याचा देखील समावेश आहे. गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली कारवाई या निकषांआधारे चांगला-मध्यम-वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे.

राज्यात यंदा १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू होत आहे. पण काही कारखान्यांनी मागील गळीत हंगातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत(एफआरपी) अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखविणे आणि नंतर त्यांची फसवणूक करणे, ऊस गाळपास नकार देणे, काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देऊन त्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशा प्रकारे साखर कारखान्यांकडून फसवणूक केली जात आहे. काही कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देतात. त्यामुळे सक्षम कारखाना कोणता हे शेतकऱ्यांना सहज समजावे, कोणत्या कारखान्यास ऊस घालावा याबाबत माहिती मिळावी यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता.

त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि किफायतशीर किं मत नियमित देणारे, हंगामात थोड्या विलंबाने एफआरपी देणारे आणि हंगाम संपूर्णही मुदतील एफआरपी न देणारे तसेच साखर जप्तीची कारवाई झालेल्या कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर के ला आहे. या माहितीमुळे कोणत्या कारखान्याला ऊस घालावा याचा निर्णय घेणे शेतकऱ्यांना सोपे होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!