बीड : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भेट दिली. तसेच सध्या त्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सोमवारी परळी येथे पंकजा मुंडेनी नागरिकांना एक सुखद धक्का दिला. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे शहरातील अंबेवेस भागातील एका हॉटेलमध्ये चहाचा आस्वाद घेत असत. त्याच ठिकाणी पंकजा यांनी अचानकपणे भेट देऊन चाय पे चर्चा केली.
पंकजा मुंडे आज सकाळपासूनच परळी शहरात विविध भागात भेटी देत होत्या. अंबेवेस भागात आल्यानंतर त्या अचानक थेट प्रकाश खोत यांच्या म्हाळसाकांत हॉटेलमध्ये गेल्या. खोत यांचे वडिल गोपीनाथ मुंडे यांचे सुरुवातीपासूनचे सहकारी होते. गोपीनाथ मुंडे नेहमी या ठिकाणी आवर्जून चहा पिण्यासाठी येत असत. या माध्यमातून ते थेट नागरिकांशी संवादही साधायचे.
https://twitter.com/Pankajamunde/status/1442411983177850880
आज त्याच हॉटेलमध्ये पंकजा मुंडे यांनी भेट दिली. त्यांनी खोत कुटुंबीयांची त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांनी तयार केलेला चहा देखील घेतला. यावेळी या भागातील नागरिक देखील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत चहाचा आस्वाद घेताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा मिळाला.
तत्पूर्वी रविवारी पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथे भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला होता. ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सर्वांना जपायची आहे. श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगडावर नतमस्तक होण्यासाठी मी येणार आहे, तुम्हीही येणार ना? अशी साद पंकजा मुंडे यांनी घातली. ‘दरवर्षी दसरा मेळाव्याला देशभरातून एका रात्रीत लाखो लोक जमा होतात, मागील वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन मेळावा घेतला. ही परपंरा अखंड ठेवण्यासाठी यंदा मी नतमस्तक होण्यासाठी येणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पवारांकडून या नेत्यांनी केवळ लुटा हेच शिकलं; आता पवार, ठाकरेंना आव्हान देतो की हिम्मत असेल तर…’
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- वयाच्या 40 व्या वर्षी ‘थाला’ची कमाल सुरूच; केला ‘हा’ मोठा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

