Share

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक भोवणार, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली

Published On: 

पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. यानंतर आता या दोन्ही तालुक्यात यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आजपर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोनाची लागण झाली असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे अशी माहिती समोर येत आहे.

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे असे सांगत सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसींपैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.लस कमी प्रमाणात या दोन तालुक्यात येत असल्यामुळे नागरिक आरोग्य केंद्रामधून माघारी जात आहेत. पंढरपूर व मंगळवेढा येथे यासाठी दोन लसीकरण केंद्र सुरु करावीत व जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिचारक यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधनानंतर विधानसभेची जागा रिक्त झाल्याने या विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे.वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढतही भालके आणि आवताडेंमध्येच होणार आहे.

अत्यंत चुरशीच्या या लढतीत कोण जिंकणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यात सरळ लढत मतदारसंघात बघायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!