Share

दमदार खेळीनंतर ऋतुराज गायकवाडने केली कॅप्टन कूलची स्तुती, म्हणाला…

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १८ धावांनी मात करत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. चेन्नईने दिलेल्या २१ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह चेन्नईने गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाडने महत्वाची कामगिरी बजावली.

चेन्नईकडून खेळणाऱ्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाड याने मागील हंगामात आपली छाप पाडली होती. गेल्या तीन सामन्यात फारशी चांगली कामगिरी न करता आल्याने या सामन्यात ऋतुराजला संधी मिळेल का ? असा सवाल निर्माण झाला होता. मात्र, या सामन्यात खेळायला मिळालेल्या संधीच सोनं केलं आहे.

सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड याने फाफ डु प्लेसीसच्या मदतीने शतकी भागीदारी रचली. चेन्नई संघाच्या धावा ११५ वर असताना चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर ऋतुराज झेलबाद झाला. मात्र, त्याने ४२ चेंडूंमध्ये ६४ धावांची खेळी केली असून त्यात ४ षटकार व ६ चौकारांचा समावेश आहे.

दमदार खेळीनंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला, ‘पहिल्या तीन सामन्यांत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण, जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये अनुभवी खेळाडू असतात, तेव्हा तुमचा भार हलका होतो. खरं सांगायचं तर फ्लेमिंग, धोनी आणि संघ मला सतत प्रोत्साहन देत होते. त्या तीन सामन्यांतूनही त्यांनी सकारात्मक गोष्टीच पाहिल्या. मी थोडा अडखळत होतो, परंतु आत्मविश्वास कायम होता. मागील सामन्यानंतर रॉबीन उथप्पा माझ्याजवळ आला आणि माझ्याची चर्चा केली.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!