जालना: शहरात मुख्य रस्त्यावर तसेच गल्ली बोळात गर्दीतुन सुसाट व बेपर्वाहपणे वाहने चालवणाऱ्यांची संख्या दिवसे न दिवस वाढतच चालली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर विशेष करून बस स्थानक ते भोकरदन नाक्यापर्यंत रात्रीच्यावेळी काही टवाळखोर सुसाट वेगाने कर्णकर्कश हॉर्नचा आवाज करीत गाड्या पळवितात. या ठिकाणी अनेक वाहनधारक सुसाटवेगाने वाहने चालवत असल्याने नागरीकांना, लहानमुलानां व महिलांना जिव मुठीत घेउन चालावे लागत आहे.
आता कोरोनामुळे रस्त्यांवर फारशी गर्दी राहत नसल्याने हे दुचाकीधारक सुसाट वेगाने गाड्या पळवतांना दिसतात. अशा विनापरवाना वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांनी केली आहे. सुसाट वाहने पळविणाऱ्यांमध्ये काही हौशी तरूणांसह अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. वाहने चालवितांना ही मुले धावत्या वाहनावरच स्टंटबाजी करतात. यातील अनेकांकडे वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही. त्यामुळे अनेक वेळा शहरात छोटे मोठे अपघात होतात.
वाहनधारकात कुठलीच शिस्त राहीली नसुन अनेक वेळा भरधाव वेगाने चालतांना एखाद्याला धक्का लागुन वाद निर्माण होतो. जड वाहनामुळे शहरात अनेकवेळा वाहतुकही ठप्प झालेली दिसते. मुख्य रस्त्यावरच अनेक फळ विक्रेते व भाजीपाला गाडीवाले बस्तान मांडतात. या परीसरात नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसतो. याकडे वाहतुक विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरीकांनी व्यक्त केल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिक : कशाची शिक्षा आपण भोगतोय? दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप
- सीताराम येचुरींना पुत्रशोक; कोरोनाने अवघ्या ३४ व्या वर्षी झालं निधन
- राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक
- महाराष्ट्राचा असा छळ कश्यासाठी ? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
- पाकिस्तानात आलिशान हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, चिनी राजदूताला मारण्याचा होता डाव ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

