Share

शारजातील वाळूच्या वादळानंतर आलेल्या ‘सचिन’ नावाच्या वादळाच्या खेळीला आज २३ वर्षे पुर्ण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळीपैकी एक खेळी म्हणजे शारजामध्ये कोकाकोला कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलीयाविरुद्ध केलेली १४३ धावांची वादळी खेळी. आज या सामन्याला २३ वर्षे पुर्ण झाली आहेत. मात्र सचिनची ती खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांना आठवते.

२२ एप्रिल १९९८ रोजी झालेल्या हा सामना भारतासाठी अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाचा होता. शारजामध्ये भारतासमोर आव्हान होते त्याकाळातील बलाढ्य संघ ऑस्ट्रेलीयाचे त्या संघाचे नेतृत्व स्टिव्ह वॉ करत होता तर मार्क वॉ, मायकल बेवन, रिकी पाँटिंग, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉर्न, टॉम मूडी, डॅमिएन फ्लेमिंग यासारख्या दिग्गज खेळाडुचा भरणा त्या संघात होता. ऑस्ट्रेलीया संघ आधिच अंतिम फेरीत दाखल झाल्याने त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा नव्हता. त्यावेळी सचिन एक स्टार खेळाडू होता. आणि ऑस्ट्रेलीया संघातील शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलीयाचा स्टार गोलंदाज. त्यामुळे या दोन स्टार खेळाडूंमधील मैदानावरील युद्धाची जोरदार चर्चा होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २८४ धावांचा डोंगर उभा केला ऑस्ट्रेलियाकडून मायकल बेवनने १०१ धावांची शतकी खेळी तर मार्क वॉने ८१ धावा केल्या होत्या. वेंकटेश प्रसादने भारताकडून सर्वाधिक २ गडी बाद केले होते.

ऑस्ट्रेलियाने भारताला २८५ धावांचे आव्हान होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर वादळाने या सामन्यात अर्धातासाचा व्यत्यय आणला. सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर भारताला विजयासाठी ४६ षटकात २७६ धावांचे आव्हान होते. तर अंतिम सामन्यात प्रवेशासाठी भारताला ४६ षटकात २३७ धावा हव्या होत्या. भारताची सलामी जोडी सचिन-गांगुली मैदानावर आली. सचिनने त्याच्या ताफ्यातील सर्व फटके मारत त्याचा इरादा स्पष्ट केला होता. भारताने ४ विकेट्स गमावल्या तेव्हा १३८ धावा केल्या होत्या. २९ षटके झाली होती. यावेळी सचिनने आक्रमक पवित्रा स्विकारत कास्प्रोविक, वॉर्न, स्टिव्ह वॉ, आणि शेन वॉर्न अशा सगळ्याच गोलंदाजांच्या आक्रमक फटके मारायला सुरुवात केली. तसेच सचिनने कट, पूल, फ्लिक, ड्राईव्ह अशा सगळ्या नयनरम्य शॉटचा वापर केला. ५ चौकार आणि ३ षटकारासह सचिनने शतक पूर्ण केले.

भारताला विजयासाठी २० चेंडूत ३४ धावांची गरज असताना सचिन १४३ धावावर. या खेळीत सचिनने ९ चौकार आणि ५ षटकार मारले होते. फ्लेमिंगच्या गोलंदाजीवर सचिन बाद झाल्यावर भारताला केवळ ८ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाचा डाव ४६ षटकात ५ बाद २५० धावांवर संपुष्टात आला. तो सामना ऑस्ट्रेलियाने २६ धावांनी जिंकला. मात्र सचिनने बाद होण्याआधी भारताला अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित करुन दिला होता. या सामन्यात सचिनला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. त्याने शारजात आलेल्या वाळूच्या वादळानंतर केलेली ‘वादळी खेळी‘ म्हणून त्याचे हे शतक प्रसिद्ध झाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!