Share

हिंगोली जिल्ह्यात कोरोना निर्बंध मोडणाऱ्या १३ दुकानदारांवर कारवाई

Published On: 

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कळमनुरी पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांना कोरोनासंदर्भातील आरटीपीसीआर तपासणी करूनच दुकाने उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंगळवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्या १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.

कळमनुरी शहरासह तालुक्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून कळमनुरीचे पोलीस निरीक्षक रंजित भोईटे यांनी सोमवारी सर्व व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर तपासणी करणे अनिवार्य राहील, अशा सूचना केल्या होत्या. याचबरोबर ज्या दुकानदारांची आरटीपीसीआर तपासणी निगेटिव्ह आली, अशा दुकानदारांना दुकाने उघडण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने मंगळवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत आरटीपीसीआर तपासणी न करणाऱ्या १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत ७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्या १८ नागरिकांची कोरोना ॲन्टीजन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात २ नागरिक कोरोना बाधीत आढळल्याने त्यांना उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तसेच विनामास्क फिरणाऱ्या ३ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!