Share

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये भारतच पाकिस्तानच्या मदतीला ; काय आहे नेमके प्रकरण

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन विरुद्ध रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO देशात सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. जगातील प्रत्येकच देशाला या रशिया विरुद्ध युक्रेनच्या युद्धामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या परिणाम भोगावे लागत आहेत. भारत देश पण या युद्धामुळे होणाऱ्या परिणामांना अपवाद नाहीये.

भारतातील हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घ्यायला दर वर्षी युक्रेन देशात जात असतात. हेच विद्यार्थी आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकले आहेत. रशिया आणि भारताचे संबंध चांगले असल्याने युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना रशियाच्या लष्कराकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी ग्वाही व्लादिमीर पुतीन यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र भारतीय लोकांनी स्वतःची ओळख पटवण्यासाठी ज्या वाहनातून ते प्रवास करत आहेत त्या वाहनांवर भारताचा तिरंगा लावावा असे स्पष्ट आदेश रशियन सरकारकडून देण्यात आले आहेत. युक्रेनमध्ये भारताच्या तिरंग्याच्या  निशाणासहीत अनेक भारतीय स्वत:ला सुरक्षित समजत आहेत. लष्करी फौजांसमोर तिरंगा फडकावत भारतीय नागरिक सुरक्षित स्थळी पोहचण्यात यशस्वी होत आहेत.

त्यातच आता आश्चर्याची बाब म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेले पाकिस्तानी नागरिक पण भारतीय तिरंग्याचा आश्रय घेत आहेत. भारत सरकारने ज्या तत्परतेने युक्रेनमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यास ऑपरेशन गंगा सुरु केले आहे , त्याच तत्परतेने पाकिस्तानी सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानमध्ये लवकर आणण्यास कोणतेच पाऊल आत्ता पर्यंत उचलले दिसत नाहीये. त्यामुळे रशियाच्या आक्रमक लष्करापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तानी नागरिक भारताच्या तिरंग्याचा आश्रय घेताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!