मुंबई: उद्यापासून म्हणजेच ३ मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. आज (२ मार्च) भाजपने पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर सवाल उठवले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांची उपस्थिती होती.
सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु असल्याचे दिसून येते आहे. त्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या कारवाया, आरोप-प्रत्यारोप याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक अटक आणि त्यांचा राजीनामा, संजय राठोड प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यातीलच काही महत्वाची मुद्दे.
दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मलिकांना वाचवायला अख्खे सरकार उभे-
दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. मात्र आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस असून आम्ही अनेक मुद्दे मांडणार आणि चर्चा सुद्धा करणार. असे फडणवीस म्हणाले आहेत.
दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही.
ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 2, 2022
अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही..
आज शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. त्यामुळे ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे. मात्र भाजप ठाकरे सरकारला कर्जमाफीतील अपूर्ण बाबी द्यायला लावणार. असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले आहे.
छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीला उपोषणाला बसावं लागणं ही असंवेदनशीलता-
ठाकरे सरकारला ओबीसींवर इतका राग का आहे, हा प्रश्न आम्हाल पडतो. विविध समाजांचे प्रश्न आहेत. छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले. छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीला उपोषणाला बसावं लागावं ही असंवेदनशीलता या सरकारने बघितली, पुन्हा तीच आश्वासनं देण्यात आली आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या योजना बंद करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.
ठाकरे सरकार बेवड्यांना समर्पित सरकार-
भ्रष्टाचार चरणसीमेला पोहचला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार म्हणून या सरकारचं नाव लिहिलं जाईल. कायदा आणि सुव्यवस्था इतकी वाईट आहे. बेवड्यांना समर्पित असं हे सरकार आहे. या सरकारने लॉकाडाऊनपासून आतापर्यंत दारु करता जेवढे निर्णय घेतलेत, त्यांच्या एक दशांशही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले नाही.
शेतकऱ्यांना कोणती मदत नाही.
ऊस गाळपासाठी जाणार नाही, अशी स्थिती आहे.
कर्जमाफीतील अपूर्ण बाबी द्यायला लावणार.
विविध समाजांचे प्रश्न आहेत.
छत्रपतींना उपोषणाला बसायला बाध्य व्हावे लागले.
आणि पुन्हा तीच आश्वासने सरकारने दिली: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 2, 2022
संजय राऊतांना आव्हान-
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. यावरही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आयटी घोटाळा झाला असेल तर कारवाई करा, कुणी थांबवलंय? असं आव्हान देत महाराष्ट्र दाऊदपुढे झुकणार नाही, माझ्या पत्रकार परिषदेप्रमाणे त्यांच्याही पत्रकार परिषद घ्या, फिक्समॅच करु नका”, असे ते म्हणाले आहेत.
यातून सरकार आणि राष्ट्रवादीचे चरित्र समोर येते-
देशद्रोहीसोबत व्यवहार करणे यापेक्षा गंभीर गोष्ट असून शकत नाही. आणि नवाब मलिक यांच्याबाबत हे स्पष्ट दिसून येत की, मुंबईच्या हत्यारांसोबत त्यांनी व्यवहार केला. मग अशा व्यक्तीच्या सोबत सरकार का उभी आहे? तुम्ही अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेता. मग नवाब मलिक यांचा का नाही? असा सवाल करत यातून सरकारचे आणि राष्ट्रवादीचे चरित्र अमोर येते. असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एल्गार पुकारणार-
ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर तुम्ही राज्य करत आहात, त्यांच्या बाबतीत इतकी असंवेदनशीलता, ही अहंकारी भूमिका सरकारने घेतली आहे. ली दोन वर्ष अस्मानी संकट आणि आता हे सुलताना संकट शेतकऱ्याला झेलावं लागतंय, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत. हे सावकारी सरकार आहे. उर्जामंत्री ज्या प्रकारे वक्तव्य करत आहेत त्यावरुन असं वाटतंय की लोकशाही राज्यात आहोत की तानाशाही राज्यात आहोत असं वाटतंय. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एल्गार पुकारणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान या सर्व मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. त्यातच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर, उद्याचे अधिवेशन होऊ देणार नाही. असा इशाराही भाजपने दिला आहे. तसेच तुमच्यासारख्या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल. तुम्ही म्हणजे मराठी किंवा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची बारा कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे आणि ती तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
कॉर्डेलिया क्रूझशिप ड्रगमध्ये आर्यन खानविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचा अहवाल एनसीबीने फेटाळला
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात जोडला गेला ‘हा’ फिरकी गोलंदाज
‘विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही’ – जयंत पाटील
आता शेतमालाला मिळणार योग्य दर्जाचा दर! ‘ही’ नवीन योजना उपलब्ध..
“अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही…”, फडणवीसांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

