टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० राज्यसभेनंतर लोकसभेतही मंजूर झाले आहे. हे विधेयक ३७० विरुद्ध ७० मतांनी मंजूर झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. परंतु या निर्णयामुळे पाकिस्तानचा मात्र तिळपापड झाला आहे.
इमरान खान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी युद्ध करण्याची भाषा केली आहे. मंत्री फवाद चौधरी यांनी, ‘संसदेत बेकार विषयांवर चर्चा करण्याऐवजी आपल्याला भारताला खून, अश्रू आणि घामाने उत्तर दिले पाहिजे. आम्हाला युद्धासाठी तयार रहायला हवे’ असं विधान केले.
तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हद्दपार केल्याप्रकरणी पाकिस्तान सरकारनं भारताला जशीच्या तशी तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी, असं विधान विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी केले आहे. यावर उत्तर देताना इमरान खान यांनी ‘विरोधी पक्षनेत्यांना नेमकं काय हवंय? मी पाकिस्तानी सैनिकांना भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा? अस उत्तर दिले.
दरम्यान, राज्यसभेत शिवसेना खा. संजय राऊत यांनी कलम ३७० बाबत जोरदार भाषण केले. हे भाषण इतके प्रभावी होते की थेट पाकिस्तानमध्ये देखील त्याचे पडसाद उमटले. राऊत यांच्या भाषणानंतर पाकिस्तानात पोस्टरबाजी पाहिला मिळाली. रस्त्यावर जागो जागी महाभारत या टायटल खाली संजय राऊत यांचे स्टेटमेंट पोस्टर करून लावण्यात आले.
आरक्षणावरून राज्य सरकार बनवाबनवी करतंय : अजित पवार
संसदेत ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होत असताना अमोल कोल्हेंची दांडी
महिला खेळाडूंची कामगिरी प्रेरणादायी – अमृता फडणवीस
अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी नाराज, भर सभागृहात टाकला नाराजीचा कटाक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

