Share

आरक्षणावरून राज्य सरकार बनवाबनवी करतंय : अजित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्राही सुरु आहे. या यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर-खेड येथे पार पडली यावेळी अजित पवार यांनी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

अजित पवार यांनी या सभेत बोलताना ‘सरकारने ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देतो सांगितले होये परंतु अद्याप आरक्षण दिले नाही ही सगळी बनवाबनवी सुरु आहे अशी टीका राज्य सरकारवर केली. तसेच आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा सवाल भाजप आणि शिवसेनेला विचारला आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी तुमचा पाठींबा आघाडीला हवा आहे. आम्ही चांगला कारभार करु आणि नाही केला तर त्याचा जाबही विचारु शकता आमचं सरकार आणा सहा महिन्यात सर्व खात्यातील सगळ्या जागा भरुन दाखवतो असा जाहीर शब्द अजितदादा पवार यांनी जनतेला दिला.

दरम्यान, आमच्याकडे अनुभव आहे. आम्ही अनेक खाती सांभाळली आहेत. शरद पवार साहेबांसारखा एक सक्षम नेता आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे जनतेने आम्हाला आशिर्वाद द्यावा असे आवाहन अजित पवार जनतेला केले.

सुषमा स्वराज मला ‘शरद भाऊ’ म्हणायच्या, त्यांचे निधन धक्कादायक – पवार

काश्मीरच्या मुद्द्यावरून काका-पुतणे आमने सामने, अजित पवारांनी केलं विधेयकाचं स्वागत

जयंत पाटलांची पक्षावरील पकड कमी झालीय का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!