Share

संसदेत ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होत असताना अमोल कोल्हेंची दांडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाले आहे. तर आज गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. त्यानंतर आता या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे.

कलम ३७० रद्द करणे हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदार चर्चा करत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे सभागृहात उपस्थित नाहीत. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा सुरु असताना अमोल कोल्हे हे उपस्थित नसणे हे त्यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही लज्जास्पद बाब आहे.

खासदार अमोल कोल्हे हे सध्या पक्षाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे नेतृत्व अमोल कोल्हे यांच्याकडे आहे. या यात्रेद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

दरम्यान, आज अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. यावेळी त्यांच्या सोबत विधानसभेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

गौतम गंभीरने घेतला आफ्रिदीचा समाचार म्हणाला…

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक; प्रसंगी यासाठी जीवही देऊ : अमित शाह

कलम ३७० हटवून ढासळलेली अर्थव्यवस्था झाकण्याचा प्रयत्न तर नाही ना ? – अमोल कोल्हे

शिवस्वराज्य यात्रा : पुढचा मुख्यमंत्री आघाडीचाचं – अमोल कोल्हे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!