Share

‘पाकिस्तान तालिबानचं दुसरं घर’, अफगाणिस्तानावर वर्चस्वानंतर तालिबानचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर केल्या नंतर तालिबानने पहिल्यांदाच काश्मीरच्या विषयावर तसेच भारत-पाकिस्तान संबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे. या दरम्यान तालिबानने ‘पाकिस्तान तालिबानचं दुसरं घर’ असल्याचे देखील म्हंटले आहे.

तालिबानचा प्रवक्त जबीहुल्ला मुजाहिद याने एका मुलाखती दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावावरही मुजाहिदने आपली प्रतिक्रिया नोंदवली. यासंदर्भात मुजाहिद म्हणाला की,’दोन्ही देशांनी एकत्र बसून वादावर तोडगा काढायला हवा. कारण दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत आणि या दोन्ही देशांचे हीत एकमेकांशी निगडीत आहे’. तसेच ‘पाकिस्तान हे तालिबानचं दुसरं घर आहे आणि आपल्या घराविरुद्ध काहीही होऊ देणार नाही’, असेही मुजाहिद म्हंटले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालिबानी नेता शहाबुद्दीन दिलवर याने ३० लाख अफगाण शरणार्थिंना शरण देण्यासाठी पाकिस्तानचे आभार मानल्याची माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान, ‘भारताने काश्मीर खोऱ्यातील वादग्रस्त भागाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवे’. तसेच भारतानं सरकार अफगाणिस्तानातील लोकांचे हित ध्यानात घेऊन आपली रणनीती बनवावी, असे आवाहनही मुजाहिदने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!