मुंबई : तीन दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात गायक ‘केके’ यांचे वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमात परफॉर्म करताना, केके यांना अचानक अस्वस्थ वाटत होते. यानंतर ते आपल्या हॉटेलकडे पुन्हा गेले असता, तिथेही त्यांना अस्वस्थ वाटून ते कोसळले. यानंतर त्यांना कोलकाता मेडीकल रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे दाखल करण्यात आले. पण काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
केकेच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसली. अनेक दिग्गज कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. यामध्ये आता केकेला श्रद्धांजली वाहिल्यामुळे रॅपर बादशाहला मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आले. यावर रॅपर बादशाहने देखील त्याची प्रतिक्रिया दिली आहे. बादशाहने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर केकेचा फोटो शेअर करत का असे कॅप्शन लिहिले. हे पाहिल्यानंतर एका इंस्टाग्राम युजरने बादशाहाला तू कधी मारणार असा मेसेज केला.

नेटकऱ्याच्या या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत बादशाह म्हणाला, एक सेलिब्रिटी म्हणून दररोज अशा प्रकारच्या मेसेजला सामोरे जावे लागते. यानंतर बादशाहने आणखी एक स्टोरी शेअर केली आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “तुम्ही जे पाहता ते एक भ्रम आहे, तुम्ही जे ऐकता ते खोटं आहे, कोणीतरी तुम्हाला भेटण्यासाठी मरत आहे, तर कोणी तुमच्या मरण्यासाठी प्रार्थना करत आहे”. बादशाह बॉलीवूडमधील एक लोकप्रिय रॅपर आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत.
महत्वाच्या बातम्या :


