नवी दिल्ली : विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत के एल राहुलने संघाची धुरा सांभाळली. भारतीय संघासाठी पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या के एलसाठी हि संधी मानवली नाही. भारतीय संघाला ३ सामन्याच्या या मालिकेत एकही सामना जिंकता आला नाही , ज्यामुळे सगळ्यांचीच घोर निराशा झाली. मात्र या पराभवानंतर कर्णधार के एलने चाहत्यांना संबोधणारी एक भावनिक पोस्ट केली आहे.
के एलने मालिकेतील शेवटचा सामना गमवल्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहली ज्यात तो म्हणाला ” कठीण प्रवास तुम्हाला चांगल बनण्यास आणि वाढण्यास मदत करतो. निर्णय आमच्या परीने जरी लागला नसला तरी आम्ही या चुकांमधून शिकू. देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती, जी मी शब्दात सांगू शकत नाही. काम इथे थांबत नाही. आम्ही चांगल्या कामगिरीकडे आणि कधीही हार न मानण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. तुमच्या पाठींब्यासाठी धन्यवाद.”
View this post on Instagram
के एलच्या या पोस्टखाली अनेक कमेंट्स आल्या आहेत. ज्यात त्याची प्रेयसी अथिया शेट्टी हिनेही कमेंट केली आहे. सोबतच त्याच्या सहकारी खेळाडू आणि चाहत्यांनी सुद्धा त्याला पाठींबा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ताधाऱ्यांना चारी मुंड्या चित करणार’; भाजपच्या नेत्यांचा संकल्प
- तुषार कपूरने केला ‘सिंगल फादर’ झाल्याबद्दल खुलासा
- अरे बापरे ! ७२ बॉल मध्ये २३७ धावा; ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने रचला नवीन रेकॉर्ड
- “…त्यामुळेच जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा”, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल
- ‘संभाजीनगर’ घोषणा १९८८ मध्येच; विमानतळ नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात धूळ खात पडून-अंबादास दानवे


