Share

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटा अगोदर श्रेयसने दिला होता हॉलिवूडच्या ‘या’ पात्रासाठी आवाज

Published On: 

मुंबई : साऊथ चित्रपटसृष्टीतील ‘पुष्पा’ने प्रचंड लोकप्रियता मिळविले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांनी वठविलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच पुष्पाच्या हिंदी डबसाठी मराठमोळ्या अभिनेत्याने आवाज दिल्याने चर्चा ही झाली मात्र आपल्याला माहित आहे का, यापूर्वी अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) एका हॉलिवूड चित्रपटाला देखील आवाज दिला आहे.

दरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा सूर्यवंशी (Sooryavanshi) आणि हॉलिवूडपट स्पायडर मॅनला (Spider Man) देखील पुष्पाने मागे टाकले आहे. हिंदीमध्ये देखील पुष्पाने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत चांगली कामगिरी करून विक्रम मोडले आहेत. अभिनेता श्रेयस तळपदेने पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले आहे, हे चित्रपटप्रेमींना माहीत आहे.

मात्र श्रेयस तळपदे पुष्पा चित्रपटाच्या अगोदर २०१९ मध्ये रिलिज झालेल्या हॉलिवूड चित्रपट ‘द लायन किंग’साठी (Hollywood Film ‘The Lion King’) डबिंगही केले होते. डिस्नेच्या लाइव्ह-अक्शन चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये त्याने ‘टिमॉन’च्या (Timon) पात्रासाठी आपला आवाज दिला होता. त्यावेळी त्यांनी खुलासा केला होता की, आपण हे विशेषतः आपल्या मुलीसाठी केले आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे.

बॉलीवूडमधील इक्बाल, डोर, ओम शांती ओम आणि गोलमाल रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता श्रेयसने जेव्हा अल्लू अर्जून साठी आवाज दिला त्यामुळे त्यांच्या टॅलेंटला चाहत्यांसह खुद्द दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनने देखील त्याचे कौतूक केले. एवढचं नाही तर सोशल मीडियावर अल्लू अर्जूनने तुषारची लवकरच भेट घेणार आहे.

पुष्पा चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे निर्माते आनंदी असून आता ‘पुष्पा २’ वर काम करायला झाली सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम सुरू केले आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी अलीकडेच खुलासा केला की, या वर्षाच्या शेवटी म्हणजे १७ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!