Share

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पडळकर, सोमय्यांचा सहभाग; मुंबई पोलिसांकडून अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.

राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी गोपिचंद पडळकर आणि किरीट सोमय्यादेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना मंत्रालय परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

भाजपच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली.  त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!