मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ९ मे रोजीच्या सामना ‘रोखठोक’द्वारे पश्चिम बंगालच्या निकालांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी टीका करताना एका उदाहरणाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी केली आहे.
यामुळे धनगर समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. किंबहुना उद्या हे भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच… वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा!’ असा सल्ला देखील सामनाच्या मुख्य संपादिका व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना दिला आहे.
ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच… वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा!@BJP4Maharashtra pic.twitter.com/cz1GJcqn1R
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) May 10, 2021
संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं रोखठोक सदरात ?
देशात मोदींची लाट ओसरली आहे व अमित शहा यांनी शर्थ करूनही त्यांना प. बंगालात मोठा विजय मिळवता आलेला नाही, हे या निवडणुकांनी दाखवून दिले. ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले. या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल.
होळकरांच्या गादीला वारस नसल्याने स्वतः अहिल्याबाईंनी राजशकट हाती घेतले. ही विधवा बाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळींची अटकळ होती. त्यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा तात्या हा त्या दरबाऱ्यांचा प्रमुख होता. अहिल्याबाईंना हटविण्यासाठी त्याने राघोबा दादांशी संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी फूस लावली. राघोबा दादा मोठे सैन्य घेऊन इंदूरवर चालून आले.
अहिल्याबाईंचा आपल्या समोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ, असा त्यांचा विश्वास होता. अहिल्याबाईंकडे त्यावेळी फक्त पाचशे महिलांचे पथक होते. त्यांच्या ताकदीवर अहिल्याबाई युद्धास सज्ज झाल्या. त्याआधी त्यांनी नर्मदेपलीकडे डेरा टाकलेल्या राघोबा दादास निरोप पाठवला, ”तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हातात भाला आणि माझ्या पाचशे वीर महिलांना घेऊन मैदानात उतरले तर तुमची पळता भुई थोडी होईल. हरलात तर काय होईल? मी बाई माणूस असल्याने मला कोणीच हसणार नाही. पण तुमचा पराभव माझ्याकडून झाला तर जगास तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही.” राघोबा दादाला हा निरोप मिळताच त्याचे डोके ठिकाणावर आले. त्याने मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. प. बंगालात यापेक्षा वेगळे काय घडले?
महत्वाच्या बातम्या
- नानांनी कचराच करून टाकला; बघूया शिवसेनेची किती औकात उरलीये – राणे
- ‘सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचाही राजीनामा देईल’
- चांगल्या कामात उशीर कशाला ? आजारातून मुक्त होताच शरद पवार ‘एक्शन मोड’मध्ये
- ‘कोरोनाची झुंज हरलो, मी पुन्हा जन्म घेईन’ अशी पोस्ट करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यु
- कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

