Share

‘कोरोनाची झुंज हरलो, मी पुन्हा जन्म घेईन’ अशी पोस्ट करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यु

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात कोरोना रुग्णाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच कोरोना रुग्णाना अपुऱ्या औषधापोटी आणि अपुऱ्या ऑक्सिजन सिलींडर मुळे जिव गमवावा लागत आहे.

अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निरज पांडे यांच्या ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सिरीजमधील अभिनेता राहुल वोहरा याचे कोरोनामुळे रविवारी ९ मे रोजी दिल्ली येथे निधन झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युच्या एक दिवस आधिच ८ मे रोजी राहुने एक फेसबुक पोस्ट करत ‘पुन्हा लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता हिंमत हरलोय’ असे लिहीले होते. या पोस्टच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. दिग्दर्शक अरविंद गौड यांनी सोशल मीडियावरुन राहुलच्या निधनाचं वृत्त दिलं. तसेच ४ मे रोजी त्याने ‘मला कोरोनाची लागण होऊन चार दिवस झालेत, मी रुग्णालयात उपचार घेतोय पण रिकव्हरी झालेली नाही. ऑक्सिजन लेव्हल पण कमी होत आहे. कुठे ऑक्सिजन बेड मिळेल का?’ अशी पोस्ट केली होती.

https://www.facebook.com/irahulvohra/posts/318103159678798

३५ वर्षीय राहुल व्होरा याला काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान त्याने अनेकदा फेसबुकवर पोस्ट करत मदतीची मागणी केली होती. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याला जिव गमवावा लागला. स्वदेस या चित्रपटात आणि स्पेशल ऑप्स या वेब सिरीजमध्ये त्याने काम केले आहे. त्याने केलेल्या शेवटच्या पोस्टमध्ये त्याने पंतप्रधान मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांना टॅग केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!