मुंबई: पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून सांगलीत सध्या राजकारण रंगताना दिसून येत आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत उद्घाटन केल्याचा दावा केला आहे. तर यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत पडळकरांवर निशाणा साधला आहे.
“हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. कोकणात तोतला व इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहते आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे. आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल”, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. आता आज त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत टीका केली आहे.
“हे आहेत राजमाता अहिल्यामाई यांचे थेट वंशज युवराज यशवंतराव होळकर, ज्यांनी आयुष्यात कधी पेशव्यांची चाकरी केली नाही .आजकाल महामानवाच्या नावाचा गैरवापर करुन पेशव्याच्या नादाला लागत स्टंट करणाऱ्या उपट सुंभाला एकदिवस पेशवे शेणात पडलेल्या शेंगदाण्यासारखे काढून फेकतील.”, असे ट्वीट करत अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि युवराज यशवंतराव होळकर यांचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच #मंगळसूत्र चोर हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
दरम्यान अहल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर पडळकर यांनी आक्षेप घेत, काल (२७ मार्च ) स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी सांगलीत हजारो कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. मेढपाळांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासाठी त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली होती. त्यामुळे स्मारक उद्घाटन वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: २०६ धावांचे डोंगर सर करत पंजाबची विजयी सलामी ; आरसीबीवर ५ विकेट्सने मात !
IPL 2022: मुंबईने सामना गमावला; मात्र इशान किशनने अर्धशतक करत केली सचिनची बरोबरी
IPL 2022 MI vs DC : दिल्लीचा विजयारंभ; ललित-अक्षरनं हिरावला मुंबईचा विजयी घास!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

