वाराणसी : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवत आहे. देशात देखील अशीच परिस्थिती आहे. दिल्लीत देखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशात दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. तुम्ही कोणासमोरही गयावया करा, उधार घ्या किंवा चोरी करा पण दिल्लीत कुठूनही ऑक्सिजन घेऊन या. आम्ही रुग्णांना अशाप्रकारे मरताना बघू शकत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसी मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वारणासीमध्ये केवळ १० तास म्हणजचे सायंकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक असून, रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सर्व खासगी रुग्णालयांसाठी निर्देश जारी केले आहेत. दुपारी १२ वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे सांगितले गेले होते. याचाच अर्थ केवळ सायंकाळपर्यंत ऑक्सिजन पुरेल, एवढाच साठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशांनुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना रुग्णालयांमध्ये सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करून घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यभरात रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक टाक्यांचे ऑडिट करा- रामदास आठवले
- ‘राज्य सरकार चुकतंय हे आता शिवसेनेचे नेतेच सांगतायत’
- नाशिक मधील घटनेनंतर पुणे मनपा खडबडून जागी, खासगी रुग्णालयांना दिले ‘हे’ आदेश
- ‘एसटी’ची चाके कोरोनात रुतली, डिझेलसाठी ही मारामार ! प्रवाशांअभावी अनेक गाड्या रद्द
- फडणवीस म्हणाले होते, मी नाशिक दत्तक घेतोय; आता काँग्रेसने करून दिली ‘ती’ आठवण !


