Share

‘एसटी’ची चाके कोरोनात रुतली, डिझेलसाठी ही मारामार ! प्रवाशांअभावी अनेक गाड्या रद्द

Published On: 

औरंगाबाद : गतवर्षी कोरोनामुळे जवळपास ३ महिने एसटी लॉक्ड होती. त्यानंतर हळूहळू एसटी बस सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार एसटी बस सुरू करण्यात आली होती. १८ सप्टेंबर २०२० पासून शासन निर्देशानुसार पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीची चाके खोलात जात असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांअभावी फेऱ्या रद्द होत असून डिझेलचा खर्च तरी निघावा एवढीच माफक अपेक्षा एसटी प्रशासनाने व्यक्त केली.

आज रात्री ८ वाजेपासून नवीन निर्बंधांनुसार एसटीला ५० टक्के क्षमतेने चालवल्या जातील. ज्या मार्गांवर ५० टक्के प्रवासी देखील नसतील अशा मार्गांवर बस सोडल्या जाणार नसल्याचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिने शंभर टक्के बंद असलेली बससेवा सामाजिक अंतर राखून २० ऑगस्ट पासून ५० टक्के आसन क्षमतेनुसार सुरू करण्यात आली होती. त्यामुळे एका बसमधून २२ प्रवाशांचीच वाहतूक केली जात होती. शासनाने आदेश काढून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्यास मंजूरी दिली. पूर्वीसारखी प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दिसू लागली होती.

तोच पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये राज्यात आणि शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज (दि.२२) रात्री ८ वाजेपासून एसटी बससेवा ५० टक्के क्षमतेने धावतील. मात्र गतवर्षी झालेल्या कोटींच्या कोट्यातून एसटी सावरलेली नसतांना पुन्हा एकदा जुनेच पाढे गिरवण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. कोरोनाच्या आधी दररोज ५० लाखांचे उत्पन्न मिळवणारी एसटी सध्या २० ते २५ लाखांवर येऊन ठेपली आहे. तर येत्या काळात हा आकडा ५ ते १० लाखांवर पोहोचेल. डिझेलचा खर्च तरी निघायला हवा अशा प्रकारचे नियोजन केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!