Share

राज्यभरात रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक टाक्यांचे ऑडिट करा- रामदास आठवले  

Published On: 

मुंबई   – नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी असे मृत्यूचे थैमान राज्यात इतर कुठेही पुन्हा घडू नये याची खबरदारी राज्य सरकार ने घ्यावी. त्यासाठी राज्यभरातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्यांची तपासणी करावी, ऑडिट करावे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.

नाशिकच्या डॉ.झाकीर हुसैन रुग्णायलयाला ना.रामदास आठवले उद्या दि. 23 एप्रिलला भेट देऊन पाहणी करणार आहेत. या दुर्घनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने सांत्वनपर 10 लाख रुपये निधी द्यावा अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे.

ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने व्हेंटिलेटर वर असलेले 24 रुग्ण तात्काळ मृत्युमुखी पडले ही नाशिकची घटना मन विदीर्ण करणारी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली रामदास आठवले यांनी वाहिली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करून निष्कळजीपणा बद्दल दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली.

राज्यातील सर्व रुग्णायलयात असणाऱ्या ऑक्सिजन टॅंकची देखभाल पाहणी करून ऑक्सिजन पुरवठयात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. ऑक्सिजन टॅंक दुरुस्ती कडे लक्ष द्यावे. टॅंक लिकेजमुळे इतकी भीषण घटना घडली या घटनेवरून संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण असून पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकार ने खबरदारी घ्यावी असे मत  रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!