पुणे : नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. यामुळे सुमारे दीड ते दोन तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे १२० हुन अधिक गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर अवलंबून होते.
ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अक्षरशः श्वास घेता न आल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून ते सर्वपक्षीयांनी शोक व्यक्त केला. आता या घटनेनंतर पुणे महानगर पालिका खडबडून जागी झाली आहे. पुणे महापालिकेने आता सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनशी संबंधित सुविधांचं ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अनेक खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून परवानगी देत कोरोना रुगणांवर उपचार सुरू आहेत. अनेक खासगी हॉस्पिटल पूर्णपणे तर काही ठिकाणी ठरावीक बेड हे कोविड रुग्णांवर उपचारासाठी राखीव आहेत. जवळपास हे सर्वच बेड भरलेले असल्याचं चित्र आहे. त्यामुळं खासगी हॉस्पिटमध्ये मोठ्या प्रमणावर रुग्ण आहेत. अशा परिस्थितीमध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी मनपानं आता आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. पुणे महानगर पालिकेच्या वतीने त्यांच्या हद्दीतील सर्वच खासगी रुग्णालयांना त्यांची ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, ऑक्सिजन साठवण्याची यंत्रणा आणि इतर संबंधित बाबींचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस म्हणाले होते, मी नाशिक दत्तक घेतोय; आता काँग्रेसने करून दिली ‘ती’ आठवण !
- मुंडन करून नाभिक समाजाने केला ठाकरे सरकारचा निषेध!
- दुचाकीवर बनावट नंबर टाकून फिरणारा जेरबंद
- अंत्यसंस्कारासाठी स्मशानात अभूतपूर्व गर्दी, स्मशानभूमी परिसरातील लोक त्रस्त
- मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून घाटीत नेतांना ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू..? प्रशासनाचा इन्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
