नाशिक : नाशिक मधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली होती. यामुळे सुमारे दीड ते दोन तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे १२० हुन अधिक गंभीर रुग्ण हे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वर अवलंबून होते.
ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अक्षरशः श्वास घेता न आल्याने त्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून ते सर्वपक्षीयांनी शोक व्यक्त केला. तर काही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं देखील दिसून आलं आहे.
आता काँग्रेसने भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक आठवण करून दिली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकांवेळी फडणवीसांनी आक्रमकपणे भाषण केलं होतं. ‘मी नाशिक दत्तक घेतोय. तुम्ही मला सत्ता द्या, मी नाशिकचा चेहरामोहरा बदलून टाकेन. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही मला एकहाती सत्ता द्या मी तुम्हाला विकास देतो,’ अशी गर्जना फडणवीसांनी केली होती. यानंतर, नाशिककरांनी भाजपला सत्ता देखील सोपवली.
पालकत्व घेतल्यावर ते असं मध्येच सोडायचं नसतं @Dev_Fadnavis साहेब! pic.twitter.com/r0gVTkwyPR
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 22, 2021
आता, त्यांच्या या आक्रमक भाषणाची व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसने फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. ‘पालकत्व घेतल्यावर ते असं मध्येच सोडायचं नसतं देवेंद्र फडणवीस साहेब !’ असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंत्यसंस्कारासाठी स्मशानात अभूतपूर्व गर्दी, स्मशानभूमी परिसरातील लोक त्रस्त
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

