मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सामना देखील रंगला आहे. अशातच, काल एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे बदली करण्यात आली आहे. काळे यांच्यानंतर परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहे.
काळेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नवाब मलिक आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. दरम्यान, आता शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मात्र ही बदली चुकीची असल्याचे ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
यानंतर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेत्यानेच राज्य सरकार चुकत आहे असं ट्विट करून महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘शिवसेनेने नेते काय म्हणत आहेत पहा- ‘राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे.’ राज्य सरकार चुकतय हे आता शिवसेनेचे नेते सांगत आहेत.’ अशी टीका केशव उपाध्ये यांनी केलं आहे.
शिवसेनेने नेते काय म्हणत आहेत पहा- ‘राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे.’
राज्य सरकार चुकतय हे आता शिवसेनेचे नेते सांगत आहेत. https://t.co/O99AkyQnLi— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 22, 2021
नेमकं काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील ?
‘राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे. अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून हे बाब अतिशय दुर्दैवी आहे.’ असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
यासोबतच, ‘मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे,’ अशी भूमिका देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस म्हणाले होते, मी नाशिक दत्तक घेतोय; आता काँग्रेसने करून दिली ‘ती’ आठवण !
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

