Share

दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरसाठी उभारल्या जाणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने एक व जिल्हा प्रशासनाने एक असे दोन ऑक्सिजन प्लांट मंजूर झाले आहेत. यातील एक प्लांटचे साहित्य आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना संसर्गामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा वर्षभरापूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. पण वर्षभरानंतरही ऑक्सिजन प्लांट सुरू झाला नाही. लिक्विड ऑक्सिजन प्लांट बारगळल्यानंतर हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे दोन प्लांट मेल्ट्रॉनसाठी मंजूर झाले.

एक प्लांट पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मिळाला तर दुसरा प्लांट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला आहे. दरम्यान ऑक्सिजन प्लांटचे साहित्य मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर परिसरात आले आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात हा प्लांट कार्यान्वित होईल, असे सांगण्यात आले. पण हा प्लांट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू केले जात आहे की, पर्यटनमंत्र्यांच्या पुढाकारातून मिळालेला आहे, याविषयी प्रशासन संभ्रमात आहे.

दोन लाख रुपयांचा मिळाला धनादेश

ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी एरॉक्स कंपनीतर्फे दोन लाख रुपयांच्या अनामत रकमेचा धनादेश महापालिकेला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सुरू होणार प्लांट जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी ठाकरे यांच्या पुढाकारातून मिळालेल्या प्लांटचे साहित्य आल्याचे सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!