🕒 1 min read
औरंगाबाद : जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज औरंगाबाद आणि मराठवाड्यात गुंतवणूक करण्याकडे लक्ष देत आहे. आणि त्या उद्देशाने त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्त आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी टीमशी बुधवारी ऑनलाईन बैठक घेतली. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टोटल एनर्जींनी इन्व्हेस्ट इंडियाच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटीशी संपर्क साधला होता. औरंगाबाद भागातील जैव-ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्यावर या संस्थेचा विचार आहे.
या बैठकीत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आयुक्त व प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडेय, औरंगाबाद स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीजचे ज्यूल डिऔर, ग्रीन एनर्जी लिमिटेडचे प्रताप मोंगा आणि इन्व्हेस्ट इंडियाचे वेदांत राज यांची उपस्थिती होती. सादरीकरणात औरंगाबाद स्मार्ट सिटीने इंडो-फ्रेंच संबंधांवर प्रकाश टाकला. १६५३ मध्ये फ्रेंच प्रवासी आणि हिरा व्यापारी ट्रॅव्हिएनर औरंगाबादला आले होते.
बीबी का मकबऱ्याच्या बांधकामासाठी संगमरवरची वाहतूक जवळून बघितली होती. औरंगाबादच्या श्रीमंत आणि वैश्विक संस्कृतीमुळे ते चकित झाले होते . भारत आणि फ्रान्सची रणनीतिक भागीदारी, ऊर्जा संबंध आणि सांस्कृतिक संबंध यासह अन्य विषयांवर यावेळी चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रानंतर सौर गटात नेतृत्व करतात.
महानगरपालिका आयुक्त पांडेय म्हणाले की, औरंगाबाद ग्रामीण व शहरी जोडणी सुलभ करते. औरंगाबाद व मराठवाडा भागातील सातत्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेती करणारे लोक मोठ्या प्रमाणात पशुधनावर अवलंबून आहेत. पांडेय म्हणाले, ‘कडक उन्हाळ्यामध्ये मराठवाडात वेगवेगळ्या भागात चारा छावण्या घेण्यात येतात. ज्या जैव ऊर्जा उत्पादनासाठी बायोगॅसचा चांगला स्रोत ठरू शकतात,’ पांडेय म्हणाले.
जैव ऊर्जा वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात कारण जैव ऊर्जा उत्पादनासाठी पेंढा व इतर बायोगॅस या शेतातील अवशेष कच्चा माल म्हणून वापरता येतील, असे तिवारी म्हणाले. मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने सादर केलेल्या सादरीकरणामुळे एकूण गुंतवणूकीसाठी सकारात्मक संकेत देताना टोटल एनर्जीजच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या उपलब्धतेविषयीही अधिक माहिती मागविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आज कोरोना बाधितांचा आकडा वाढला; मात्र कोरोनामुक्तांचा आकडा अधिकच !
- ‘अल्पसंख्याक समाजाचा विकास आराखडा पंधरा दिवसात सादर करा’, अमित देशमुखांचे निर्देश
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
