Share

उस्मानाबादेत आजपासून ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित, ३५० रुग्णांना मिळेल ऑक्सिजन

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. त्यात जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आल्याने रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, बुधवारी याची चाचणी यशस्वी झाली असून गुरुवारी पूर्ण क्षमतेने प्लांट कार्यान्वित होणार आहे. ऑक्सिजन प्रकल्प ७७०० घनमीटर क्षमतेचा आहे, हा प्रकल्प परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे सुरू झालेला नव्हता. शुक्रवारी संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रकांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्र देऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती.

सातत्याने पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने बुधवारी परवानगी मिळाली आहे. यानंतर खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कोस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा शल्यचिकित्सक डी. के. पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भेट दिली. प्रकल्प १० के. एल. क्षमतेचा असून तो कार्यान्वित करण्यासाठीच्या चाचण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या.

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अन्य शासकीय, खासगी रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यासंदर्भात उपाय योजना सुरू असून, रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!