Share

ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीनं होतेय विक्री,केंद्राने उचलले ‘हे’ पाऊल

Published On: 

नवी दिल्ली- कोविड-19 रुग्णांसाठी आवश्यक ठरणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची मूळ किमतीपेक्षा कितीतरी अधिक किमतीनं विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रसरकारनं निर्बंध जारी केले आहेत. केंद्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या किमतीचे व्यापारी मार्जिन 70 टक्क्यापेक्षा अधिक ठेवता येणार नसल्याचे जाहीर केलं आहे.

9 जूनपासून हे नवीन नियम लागू होणार असून ते 30 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहेत. यामुळं रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सरकारला मिळालेल्या माहितीनुसार, वितरक जवळपास 198 टक्के नफा घेऊन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची विक्री करत आहेत. प्राधिकरणानं दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक किरकोळ व्यापारी, वितरक, रुग्णालयांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सची उत्पादकांनी लावलेल्या किंमती लोकांसाठी प्रसिद्ध करणं अनिवार्य आहे. त्यावरील निश्चित करण्यात आलेल्या मार्जिनपेक्षा अधिक नफा घेउन विक्री केल्यास अधिक घेण्यात आलेली किंमत आणि दंड भरावा लागेल.

राज्य औषध नियंत्रक यावर देखरेख ठेवतील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी सरकार ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!