Share

“राज्य सरकारने ९,७१९ कोटी विमा कंपनीला दिले त्यापैकी ३,५०४ कोटीच शेतकऱ्यांना मिळाले”

Published On: 

मुंबई : विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारवर विविध मुद्द्यांवरुन निशाणा साधला आहे. दरेकर यांनी गुरुवारी विरोधीपक्षाचा प्रस्ताव मांडला. यात दरेकर यांनी केलेल्या दीड तासाच्या भाषणात महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभाराचे वाभाडे काढले. दरेकर यांनी कृषी विभाग, सहकार, कोकणातील सिंचन आदी मुद्द्यांवर सविस्तर आकडेवारी सादर करीत सरकारवर टीका केली आहे.

दरेकर म्हणाले, राज्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अद्यापही मिळालेला नाही, चक्रीवादळ व अतिवृष्टग्रस्तांसाठी जाहिर केलेल्या ११ हजार कोटींच्या पॅकेजचा लाभ बहूतांशी शेतकऱ्यांना मिळाला नाही. शेतकऱ्यांना वाढीव वीजबिले देण्यात आले असून, या बिलांची सक्तीने वसूली सुरु आहे. सहकारी साखर कारखान्यांकडील थकीत कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यातील अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या आहेत. कोवीडच्या दोन वर्षाच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. त्यामुळे आज राज्यातील शेतकरी, कामगार, एस.टी.कर्मचारी हा सर्व वर्ग असमाधानी असून, महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला कंटाळलेला आहे. सरकार व जनता यामध्ये समन्वय नसल्यामुळे, महाराष्ट्रासारखे राज्य अनेक वर्ष विकासापासून दूर गेले आहे. अशी टिका प्रविण दरेकर यांनी केली.

पीक विम्याच्या अतिरीक्त रक्कमेची आकडेवारी मांडत दरेकर म्हणाले, फडणविस यांच्या काळात १५,७८२ कोटी विमा हप्ता पीकविमा कंपन्यांना दिला होता. त्यापैकी १३५३८.८० कोटी शेतकऱ्यानां नुकसान भरपाई पोटी परत मिळाले. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९,७१९.९२ कोटी विमा हप्ता कंपनीला दिला त्यापैकी केवळ ३,५०४ कोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी परत मिळाले आहे.

याचाच अर्थ विमा कंपन्याना दोन वर्षांच्या काळात ६,२१५ कोटी अतिरीक्त गैरव्यवहारातून कमावले आहेत. यापैकी किती रक्कम कंपनीच्या खिशात गेली व किती रक्कम महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या खिशात गेली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!