Share

पुण्यात कोरोना उपचार घेणाऱ्या २ हजार ८७५ रुग्णांपैकी २२६ रुग्ण गंभीर तर…

Published On: 

पुणे : पुणे शहरात आज नव्याने १८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८५ हजार ४६६ इतकी झाली आहे. शहरातील ३३१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार ८६६ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ६२० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ३२ हजार ६९८ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ८७५ रुग्णांपैकी २२६ रुग्ण गंभीर तर ३५५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७२५ इतकी झाली आहे.

तर मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 413 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 611 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!