औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे होणार असुन त्यासाठी बैठकही घेण्यात आल्याचे छायाचित्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादमध्ये प्रस्तावित असुन त्याकरिता जागाही निश्चित करण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली राज्य शासनाने क्रीडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादलाच करण्यात यावे इतरत्र हलविण्यात येवु नये असा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असुन त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासित केले होते. मग क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करुन मराठवाड्यावर नेहमी प्रमाणे अन्याय का करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
This university was first assigned to Aurangabad. Then under pressure from NCP the government shifted it to Pune. @Subhash_Desai had assured us that the university will come up in Aurangabad for which land was also identified. This is sheer injustice to Marathwada. https://t.co/ZclHDv5Z6t
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) July 24, 2021
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद जवळ करोडी येथे मंजूर झाले होते, गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे क्रीडा सुविधा उभारल्या जाणार होत्या. जे औरंगाबादला मंजुर केले होते ते पुण्याला चालले आहे. विद्यापीठ औरंगाबाद येथे व्हायला पाहिजे. चार वर्षे सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन करोडी येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा निश्चित करण्यात आली होती. मराठवाड्याचे सर्व कार्यालये इतरत्र हलवले जात आहे. क्रीडा विद्यापीठाबाबत तसे होवु नये अशी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला विनंती केली. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला प्रस्तावित झाले होते जागाही उपलब्ध आहे, मग इतरत्र हलविण्याचा प्रश्नच येत नाही, विद्यापीठ औरंगाबादलाच करावे अशी आग्रहाची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून साकारली ‘प्लास्टिक बॉटल डस्टबीन’
- मिलरच्या नाबाद खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची आर्यलँडवर ४२ धावांनी मात
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- बचावकार्याचा वेग वाढवून राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी – आठवले
- दुसऱ्या टी-२० सामन्यात झिंबाब्वेचा बांग्लादेशवर धक्कादायक २३ धावांनी विजय


