Share

“…पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : काल कोल्हापुरमधील झालेलं मतदान व लोकांचा पाहिलेला संयम यावरून संजय राऊत व्यक्त झाले. म्हणाले, आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं, कधी त्या क्षेत्रांवर हल्ले झाले नव्हते पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचले असा घणाघात देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच राज्यातील वातावरण तणावाचं करण्याचं षड्यंत्र देखील रचलं होतं परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हा माहोल उधळून लावला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत.

विषयावर सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत त्याच्या वरती काही कार्यवाही सुरू आहेत असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट स्थिती निर्माण करणे यासाठी हे भोंग्यांच राजकारण झालं होतं पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!