पुणे : ५ जून ला आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्याला जाणार अशी मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली. तसेच १ मे ला महाराष्ट्र दिनी आपण औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज पुण्यात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी या दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. याचा पुनरुच्चार ही राज ठाकरे यांनी केला.
भोंग्यांचा त्रास हा हिंदूंनाच होतो असं नाही तर मुस्लिमांना ही त्रास होतो असे राज ठाकरे म्हणाले. ५ जून ला आपला अयोध्या दौरा आहे. हिंदू बांधवांनी तयारीत राहावं असे राज ठाकरेंनी आवाहन केले आहे. यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचाराता राज ठाकरे म्हणाले की, “मी लवंडयाबाबत आता बोलत नाही.”
राज ठाकरे यांच्या सभेनंतर देशभरातील मशिदींमधील भोंग्यांवरून वाद सुरू झाला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा वापर बंद करा, अन्यथा मशिदीबाहेर मोठ्या आवाजात हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, अशी धमकी दिली होती. त्यांतर राजकारण चांगलेच पेटले आहे. मशिदींवर भोंगे न लावण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे राज ठाकरे मनसेच्या गुढीपाडवा सभेत म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या :


