नागपूर – राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या समस्या काय आहेत… पक्षाकडून व सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे पक्षाचा अध्यक्ष म्हणून संवाद करावा तीन पक्षांचे सरकार आहे. यामध्ये कुठल्याही तालुक्यात समन्वयाचा अभाव आहे का? अधिक सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस काम करु शकेल हे बघण्यासाठी हा संवाद दौरा असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काटोलच्या जाहीर सभेत सांगितले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचा सहावा दिवस असून नागपूर येथील काटोल मतदारसंघात जाहीर सभा पार पडली.यावेळी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलताना जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचे संरक्षण हवंय. शेतीचा व्यवसाय कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी आग्रहाची मागणी शेतकऱ्यांची आहे. परंतु केंद्रात बसलेलं भाजपच्या सरकारला या देशातल्या लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीला गराडा घातला तरी त्यांचं ऐकण्यासाठी वेळ नाही. वेळ असेल परंतु त्यांची इच्छा नाही असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांनी ६० दिवसापेक्षा जास्त दिल्लीच्या सभोवताली ठाण मांडून बसण्याचं काम केलं आहे. २६ जानेवारीला झालेल्या त्या घटनेतून शेतकरी ६० दिवस शांत बसलेत ते २६ जानेवारीला गोंधळ कसा घालतील पण थोडीशी ठिणगी पडली आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचेदेखील दिल्लीच्या सरकारने मागेपुढे पाहिले नाही असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.
आधारभूत किंमतीची कल्पना मोडीत काढण्याचे काम भाजप करत असेल तर तुम्हाला आणि माझ्या कपाशीला दर, सोयाबीनला मिळणारा दर या दराचे काय होणार ही चिंता गव्हाच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा निर्माण झाली कारण त्याठिकाणी आधारभूत किंमत तिथे केंद्र सरकारच्या एजन्सी खरेदी करतात आणि देतात. त्याऐवजी अदानी व अंबानीच्या कंपन्या खरेदीला उतरतील अशा पध्दतीची व्यवस्था नव्या कायद्याने करण्यात आली आहे. म्हणून एकसंघ राहिले पाहिजे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. अतिवृष्टी, पूर, अथवा कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर उध्दव ठाकरेंचे हे आमचं सरकार त्यांच्यामागे कोरोना काळात सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतानादेखील प्रसंगी कर्ज काढले, बाहेरून पैसे घेतले परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली याची आठवण जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला करून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे’
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहात का? – नवाब मलिक
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

