मुंबई – दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी बंदोबस्त लावताय की चीन सीमेवर की पाकिस्तान सीमेवर बंदोबस्त लावताय अशी विचारणा करतानाच जनरल डायर नीतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम योग्य नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
ही सगळी परिस्थिती निर्माण करुन दडपशाहीने आंदोलन संपवण्याचा डाव केंद्रसरकारचा आहे हे लोक स्वीकारणार नाही. ही डायर नीती बंद करावी असेही नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला ठणकावले आहे.
चार – चार बॅरिकेटर, रोडवर खिळे टाकण्यात आले आहे.शेतकऱ्यांचे अन्नपाणी बंद करायचे आणि अडचणीत येतील असा प्रयत्न होतोय ही लोकशाही पध्दत नाही तर मोदी वेगळ्या पध्दतीने चालवत आहे हे जनता कधीच स्वीकारणार नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे’
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- भडकाऊ मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळात आपोआप डिलीट होतील ?
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे


