नाशिक : अजान स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख जनाब उध्दव बाळासाहेब ठाकरे, हे मुख्यमंत्री असल्यामुळेच शरजिल उस्मानी सारख्या सडक्या औलादींची आज आमच्या पवित्र हिंदु धर्मावर , हिंदु समाजावर विष ओकण्याची हिंमत वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुणीही उठतं आणि सहनशील ,सहिष्णू असलेल्या हिंदु समाजावर टीका करतं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात या महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित होता पण जनाब उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये हिंदु अपमानित होतो आहे ,असे चित्र या महाराष्ट्रात उभं राहिलं आहे अशी खरपूस प्रतिक्रिया आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी यांनी आज नाशिक येथे दिली.
पुढे ते असेही म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली असेल पण “हिंदू समाज सडलेला आहे” ,हे वाक्य आपल्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे का आणि म्हणूनच तुम्ही शरजील सारख्या समाज कंटकावर कारवाई करीत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
आज तीन दिवस झाले पण शरजील वर कोणतीही कारवाई होत नाही. म्हणजे तुम्ही दबावाला बळी पडत आहात का किंवा हिंदु समाजाचा हा विषय आहे म्हणून हे दोन पक्ष तुम्हाला हा कारवाई करू देत नाही का ?गेल्या अनेक दिवसांपासून तुमचे विद्वान संपादक संजय राऊत, विश्वातील अनेक विषयांवर प्रतिक्रिया देऊन ज्ञान पाजळत असतात. परंतु तीन दिवसांपासून या विषयावर त्यांची ना प्रतिक्रिया ना सामनात अग्रलेख ! संजय राऊत कुठे हरवले आहेत ?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दसरा मेळाव्यामध्ये मोठमोठ्या वल्गना करणारे मुख्यमंत्री आम्ही पाहिले की, आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर आतंकवाद्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. मग तीन दिवस झाले आज शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. आपण जर येत्या दोन दिवसात शरजील उस्मानी वर कारवाई केली नाही तर हिंदू समाजाच्या स्वाभिमानासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘मराठा आरक्षणासाठी मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन’
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- भडकाऊ मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळात आपोआप डिलीट होतील ?
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !


