🕒 1 min read
पटना : गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या नावाखाली सामाजिक शांतता बिघडवण्याचा तसेच सरकारी तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. छोट्या-छोट्या कारणांसाठी रस्त्यावर उतरत काही महाभाग सामाजिक शांतता बिघडवत असल्याचे दिसून येत आहे.
एका बाजूला हे सुरु असताना आता बिहारमध्ये आंदोलन करणं आता आंदोलकांसाठी अधिक कठीण होणार आहे. बिहार पोलिसांच्या मुख्यालयाने कॅरेक्टर सर्टीफिकेट मिळवण्यासंदर्भातील नवीन आदेश जारी केले आहेत.यामुळे राजकीय वातावरण आता तापू लागले आहे.
सध्या बिहारचे पोलीस महासंचालक एस. के. सिंघल यांनी जारी केलेल्या या आदेशाचे पत्रक व्हायरल होत आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनादरम्यान एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होत असेल तर पोलीस त्याच्याविरोधात चार्टशीट दाखल करु शकतात असं म्हटलं आहे.
मुसोलिनी और हिटलर को चुनौती दे रहे नीतीश कुमार कहते है अगर किसी ने सत्ता व्यवस्था के विरुद्ध धरना-प्रदर्शन कर अपने लोकतांत्रिक अधिकार का प्रयोग किया तो आपको नौकरी नहीं मिलेगी। मतलब नौकरी भी नहीं देंगे और विरोध भी प्रकट नहीं करने देंगे
बेचारे 40सीट के मुख्यमंत्री कितने डर रहे है? pic.twitter.com/h0TDkuR5vP
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) February 2, 2021
असं झाल्यास कोणत्याही सरकारी कंत्राटासाठी किंवा सरकारी नोकरीसाठी अशा व्यक्तींना गृहित धरलं जाणार नाही, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. यावरुनच आता विरोधाकांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे’
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- मोदीसाहेब शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहात का? – नवाब मलिक
- महाराष्ट्रातील कुशल, होतकरु तरुणांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर आणा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
