मुंबई : 1 फेब्रुवारीपासून मुंबईतील लोकलसेवा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्य माणसांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.
सामान्य मुंबईकरांना वेळेचं निर्बंध घातल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवसाची पहली ट्रेन सुरु झाल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री 9 वाजेपासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यात मुभा देण्यात आली आहे. मात्र, ही वेळ चाकरमान्यांना सोयीची नसून सकाळी लवकर जावे लागते व येताना बेस्टचा आधार घेऊनच घरी परतावे लागते. बसभाडे, बससाठी लागणाऱ्या रांगा यामुळे सामान्य नागर्दिक त्रस्त झाले आहेत.
तर, गर्दी कमी करण्यासाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली असली तरी याचा विपरीत परिणाम दिसत असून अधिक गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य शासन मुंबईकरांना आणखी मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. ‘लोकल सेवा ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे. मुंबईकरांची सोय लक्षात घेऊन वेळेच्या बाबतीत काही करता येत असेल तर ते नक्की केलं जाईल. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल. शेवटी सरकारसाठी जनतेचं हित महत्त्वाचं आहे. त्यामुळं राज्य सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेईल’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत अट्टल गुन्हेगारांचे फोटोसेशन
- “शुबमन गिल येत्या काळात जगातील सर्वोत्कृष्ट सलामी फलंदाजांच्या यादीत असेल”
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- ‘देशविघातक वक्तव्य करणाऱ्या शरजिल उस्मानीला तात्काळ अटक करा’
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
