पुणे : राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या निर्बंधामध्ये नवे धोरण अवलंबल्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर पावले टाकणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात बोलताना महत्त्वाचे विधान केले.
विजय वडेट्टीवर म्हणाले, कालची आकडेवारी पाहिली तर नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तरी देखील आजच यावर ठोस भाष्य करता येणार नाही. पुढील आठ दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर ही परिस्थिती आहे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील. पुढील आठ दिवसांनंतर यासंदर्भात पुढील पाऊल उचलले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा हा कमी होताना दिसत आहे. परंतु आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाच असेल तर…; शिवसेना नेत्याचं मोठं विधान
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

