मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा येणार नाहीत असं कुठं म्हणतोय, असं विधान राऊत यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
‘आम्ही कुठं म्हणतोय नाही येणार म्हणून. भाजप पक्षाचे ते नेते आहेत. आजही ते एक मोठे नेते आहेत. त्यांचा चेहरा मोठा आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काही ताकद निर्माण केली तरच बरोबरीची लढत होऊ शकते.’ यासोबतच, ‘ तमिळनाडू, केरळमध्ये त्यांची जादू चालली नाही. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. राजकारण चंचल असतं. इंदिरा गांधींना, जवाहरलाल नेहरुंना , अटल बिहारी वाजपेयींना राजकारण हातात ठेवता आलं नाही,’ असं देखील संजय राऊत यांनी नमूद केलं.
आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘संजय राऊत बोलतात त्याप्रमाणे राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत हिच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी याचा विचार करावा,’ असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत जमिनीला अचानक पडला खड्डा काही क्षणात कार बुडाली ;पहा व्हिडीओ
- राष्ट्रीय महामार्ग आष्टामोड ते तिवटग्याळ रस्त्याचे काम संथगतीने; शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी
- कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; पवार-टोपे घेणार परिस्थितीचा आढावा !
- गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत आपल्याला काम करायचे – उद्धव ठाकरे
- वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

