🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
हे सर्व सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी हे आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे.
यावर आता शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाष्य केलं आहे. ‘जर काँग्रेसनं एकट्यानं लढण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही केवळ त्यांना शुभेच्छाच देऊ शकतो,’ असं त्या म्हणाल्या आहेत. यामुळे येत्या काळात राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी विविध पातळ्यांवर हे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे चिन्हे अधिक बळावत आहेत.
‘नाना पटोले हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा भाग आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं आणि आघाडीनं जनतेची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. पण भविष्यात राज्यातील निवडुका कशा पद्धतीनं लढवायच्या याबाबत काँग्रेसचे नेते ठरवतील. पण महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही आघाडी म्हणून सोबत राहू आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करु,’ असं प्रियंका चतुर्वेदी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींनी ठाकरेंना पेट्रोलचे भाव कमी करायला सांगावे’, केंद्रिय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब सल्ला
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

