Share

राजभवनात दोन मोरांमध्ये जुंपली अन् नेटकऱ्यांना अधिवेशनच आठवलं !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.

तर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ कायम असून भाजपने सभागृहाबाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. महाविकास आघाडी सरकारने आरक्षण, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना काळातील भ्रष्टाचार आदी महत्वाच्या मुद्द्यांना बगल देत केवळ वेळ मारून नेण्यासाठी लोकशाहीला कुलूप लावून अधिवेशन केल्याची टीका भाजपने केली होती. दरम्यान, पावसाळी अधिवेशन अवघ्या दीड दिवसांतच गुंडाळण्यात आलं असून सध्या सोशल मीडियावर राजभवनात दोन मोर चांगलेच व्हायरल होत आहेत.

विविध मागण्यांसाठी भाजपसह अन्य विरोधी नेते हे राजभवन गाठत असतात. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांना लक्ष्य करत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये विविध नेत्यांच्या भेटीमुळे चर्चेत असलेलं राजभवन दोन मोरांमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोशल मीडियावरून दोन मोरांच्या तुंबळयुद्धाचा व्हिडीओ शेअर केलाय.

हा व्हिडीओ राज्यपालांनी शेअर करताच प्रचंड व्हायरल झाला आणि यावर मिम्सचा पाऊस पडलाय. एवढंच नाही तर या मोरांमध्ये जुंपलेली पाहून अनेक नेटकऱ्यांना अधिवेशनच आठवलं. ‘पावसाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच राजभवनातील हिरवळीजवळ दोन मोरांमध्ये अधिवासावरून अगोदर वादावादी आणि नंतर तुंबळयुद्ध झाले !!’, असे कॅप्शनही कोश्यारी यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!