मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप आहे. नुकतेच त्याने मिताली मयेकर सोबत लग्नगाठ बांधली. सध्या सिद्धार्थ आणि मिताली सोशल मिडीयावर चांगलेच सक्रीय असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतेच सिद्धार्थने मितालीसाठी एक खास पोस्ट शेअर केली असून याची चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/p/CQ5sZENsQF0/?utm_source=ig_web_copy_link
सिद्धार्थने सोशल मिडिया वर मितालीसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर करत लिहिले की, तुझी प्रत्येक गोष्ट आवडते… तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला फार आवडतं. पाणी पिता पिता चुकून अंगावर सांडलं की एक केविलवाणा चेहरा करतेस…तो खूप आवडतो, तंद्रीत असताना काहीतरी विसरलेलं अचानक आठवतं तुला…ते सांगताना जो उत्साह असतो तो खूप आवडतो…
कुणी तुझी मस्करी केली की, एक बिचारा रुसलेला चेहरा करते…तो तर खूप आवडतो. मी बोलत असताना टक लावून बघतेस तेव्हा शब्द विसरूनंच जातो एकदम…कारण बोलण्यापेक्षा ते डोळे बघत राहायला फार आवडंत. तुझ्याकडे पाहत बसलो असताना जेव्हा तू पकडतेस तेव्हा मान हळूच हलवून ‘काय रे?’ विचारतेस ना… ते तर फार आवडतं. खरं सांगू? तुझा चिडलेला चेहरा पण आवडतो. सॉरी पण रडताना पण सुंदर दिसतेस…तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला फार आवडतं…साडी नेसून, टिकली वैगेरे लावून तर येऊच नको माझ्या, समोर बाकी कशातंच लक्ष लागत नाही. एवढं करून कशी दिसतेय मी? हे मला विचारतेस? कसं उत्तर देऊ गं… तुझे सगळे चेहरे आवडतात, सगळे डोळे आवडतात, खरंच…, इतकी सुंदर पोस्ट त्याने केल्याने त्याच्या चाहत्यांना देखील हिपोस्ट प्रचंड आवडली आहे.
नुकतेच सिद्धार्थ मितालीच्या मुंबईच्या गोरगावमधील खिडकीबाहेर त्याला विविध प्राण्यांचे दर्शन झाले असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे. याचे काही फोटो देखील त्याने सोशल मिडियावर शेअर केले होते.
महत्वाच्या बातम्या
- श्वेता तिवारीचा पती अभिनवने ‘या’ कारणामुळे घेतली कोर्टात धाव
- आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- राज्यपालांच्या नेमणुका करताना सोशल इंजिनिअरिंगवर मोदी सरकारकडून दिले जातेय विशेष लक्ष
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

